औरंगाबाद: दि.17 (सांजवार्ता ब्युरो) दलित-मुस्लिम ऐक्याची भाषा करीत वंचित बहुजन आघाडीची मोट बांधणारे एमआयएम चे अध्यक्ष खा.असदोद्दीन ओवैसी यांनी आज शहानुरवाडी परिसरत प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांनी बुद्ध विहारात येण्याचे आग्रह केला मात्र, ओवैसींनीं हाताचे इशारे करीत बुद्धमूर्तीस अभिवादन करण्यास नकार दिल्याने अनेक चर्चेना उधाण आले आहे.
एमआयएम पक्षाची एक कट्टरवादी पक्ष म्हणून प्रतिमा आहे.त्यांचे नेत्यांनी हिंदू देवी देवता बाबत अनेकवेळा वादग्रस्त विधाने केल्याने मोठे वाद निर्माण झाले होते. याच जोरावर त्यांनी मुस्लिमांना एकत्र करण्यात यश मिळविले होते. कट्टरवादी प्रतिमा दलित मुस्लिम ऐक्याचा फॉर्मल ओवेसींनी मनपात अजमावला होता.त्यात त्यांना यशही आले 26 नगरसेवक निवडून आले.हाच फॉर्मला त्यांनी लोकसभेत अजमवण्याचा प्रयत्न केला मात्र इतर पक्षाची साथ हवी हे लक्षात येताच त्यांनी ऍड प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत युती करीत दलित मुस्लिम ऐक्याची भाषा करित वंचित बहुजन आघाडी स्थापन केली खरी मात्र खऱ्या अर्थाने दलित समाजाला त्यांनी आपलेसे मानले आहे का? यावर वेळोवेळी अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आज लोकसभेचे उमेदवार इम्तियाज जलील यांच्या प्रचारार्थ खा.ओवेसी यांनी शाहनुरवाडी भागात प्रचार रॅली काढली होती. प्रचार रॅली दरम्यान दलित समाजाच्या कार्यकर्त्यांनी बुद्धीविहारात अभिवादन करण्याचा त्यांना आग्रह केला मात्र, ओवेसींनी बुद्धीविहारात अभिवादन करण्यास नकार दिला. मुस्लिम दलित ऐक्याची भाषा करणारे खा.ओवेसी यांनी अभिवादनास नकार दिल्याने स्थनिक कार्यकर्ते चांगलेच नाराज झाल्याचे दिसले